Fish For Life
Summary: मेरी जेन आणि लोनीची फिश मार्केटमध्ये भेट होते आणि नंतर त्यांच्यात प्रेमबंध निर्माण होतो. ते दोघं विवाहबद्ध होतात. ब्रॅड आणि सारा या मेरीच्या दोन्ही मुलांचाही लोनी मनापासून स्वीकार करतो. मेरीचं करियर बहरत असतं. लोनीने फिश मार्केट सोडून नर्सिंग कोर्स करायचा निर्णय घेतलेला असतो. मेरीचाही त्याच्या निर्णयाला पाठिंबा असतो; पण येवढं सगळं चांगलं चाललेलं असतानाही मेरी थोडी अस्वस्थ असते. कारण ती लोनीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसते. त्यातच तिच्या आईला विस्मरणाचा आजार जडल्याचं तिला समजतं. आईला आपल्या घरी राहायला आणावं असं तिला वाटत असतं; पण आई त्या गोष्टीला तयार होणार नाही आणि आईची जबाबदारी घेतल्यानंतर लोनीला वेळ देणं आपल्याला शक्य होईल का, लोनीची आईला इकडे आणायला काही हरकत तर नसेल ना, असे प्रश्न तिच्या मनात उभे राहतात; पण लोनीचा फिश मार्केटमधला मित्र वुल्फ याच्याशी बोलत असताना, तिला समजतं की वुल्फने वैयक्तिक जीवनातही फिश फिलॉसॉफीचा अवलंब केल्यामुळे त्याचा घटस्फोट टळला आणि तो व त्याची पत्नी आता सुखाचा संसार करत आहेत. वुल्फच्या अनुभवातून मेरीही फिश फिलॉसॉफीचा अवलंब कौटुंबिक पातळीवर करायचा निर्णय घेते आणि त्याबाबत लोनी, ब्रॅड आणि साराशी बोलते. त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मेरीला मिळतो. फिश फिलॉसाफीचा अवलंब केल्यामुळे मेरीच्या कौटुंबिक जीवनात कसे आनंदाचे झरे वाहायला लागतात, त्यासाठी आणि एक प्रसन्न, खेळकर अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Pending hold | 001335 |
मेरी जेन आणि लोनीची फिश मार्केटमध्ये भेट होते आणि नंतर त्यांच्यात प्रेमबंध निर्माण होतो. ते दोघं विवाहबद्ध होतात. ब्रॅड आणि सारा या मेरीच्या दोन्ही मुलांचाही लोनी मनापासून स्वीकार करतो. मेरीचं करियर बहरत असतं. लोनीने फिश मार्केट सोडून नर्सिंग कोर्स करायचा निर्णय घेतलेला असतो. मेरीचाही त्याच्या निर्णयाला पाठिंबा असतो; पण येवढं सगळं चांगलं चाललेलं असतानाही मेरी थोडी अस्वस्थ असते. कारण ती लोनीसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसते. त्यातच तिच्या आईला विस्मरणाचा आजार जडल्याचं तिला समजतं. आईला आपल्या घरी राहायला आणावं असं तिला वाटत असतं; पण आई त्या गोष्टीला तयार होणार नाही आणि आईची जबाबदारी घेतल्यानंतर लोनीला वेळ देणं आपल्याला शक्य होईल का, लोनीची आईला इकडे आणायला काही हरकत तर नसेल ना, असे प्रश्न तिच्या मनात उभे राहतात; पण लोनीचा फिश मार्केटमधला मित्र वुल्फ याच्याशी बोलत असताना, तिला समजतं की वुल्फने वैयक्तिक जीवनातही फिश फिलॉसॉफीचा अवलंब केल्यामुळे त्याचा घटस्फोट टळला आणि तो व त्याची पत्नी आता सुखाचा संसार करत आहेत. वुल्फच्या अनुभवातून मेरीही फिश फिलॉसॉफीचा अवलंब कौटुंबिक पातळीवर करायचा निर्णय घेते आणि त्याबाबत लोनी, ब्रॅड आणि साराशी बोलते. त्यांचाही खूप चांगला प्रतिसाद मेरीला मिळतो. फिश फिलॉसाफीचा अवलंब केल्यामुळे मेरीच्या कौटुंबिक जीवनात कसे आनंदाचे झरे वाहायला लागतात, त्यासाठी आणि एक प्रसन्न, खेळकर अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे.
There are no comments on this title.