Dwarkecha Suryast
Summary: महाभारताच्या युद्धानंतर तब्बल छत्तीस वर्षांनी प्रभासक्षेत्री झालेली यादवी आणि भगवान श्रीकृष्णाचा देहही पंचतत्त्वात विलीन झाला त्याची ही कथा आहे. कुरुक्षेत्रावरील महासंहारानंतर गांधारीने श्रीकृष्णाला ‘आजपासून छत्तीस वर्षांनी यादव कुळाचा परस्परांशी लढताना पूर्ण विनाश होईल,’ असा शाप दिला. पुढे ही छत्तीस वर्षे श्रीकृष्ण द्वारकेतच होता. त्या काळामध्ये सुरक्षित - ऐषआरामी व निष्क्रिय जीवन यामुळे कुमारवयीन लहानांपासून थोरांपर्यंत सर्व यादवगण मृगया, नृत्य-गायन यात मश्गुल असत; जोडीला अनिर्बंध मद्यपान होतेच! श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामही याला अपवाद नव्हता; साहजिकपणे इतरेजन याचा अनायासे लाभ उठवत. यात श्रीकृष्णपुत्र सांब याने महर्षी कश्यपांबरोबर केलेल्या अनुचित आचरणाची भर पडली आणि त्यांनीही यादवकुळाचा नाश होईल, असा शाप दिला. परिणामी, प्रभास क्षेत्री यादवांच्या परस्परांत झालेल्या लढाईने यदुवंशाची अखेर झाली आणि त्यानंतर श्रीकृष्णाचा, पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला. एका दुर्दैवी कालखंडाची मनाला चुटपुट लावणारी कहाणी!
Item type | Current library | Home library | Status | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Checked out | 30/01/2026 | 001325 |
महाभारताच्या युद्धानंतर तब्बल छत्तीस वर्षांनी प्रभासक्षेत्री झालेली यादवी आणि भगवान श्रीकृष्णाचा देहही पंचतत्त्वात विलीन झाला त्याची ही कथा आहे. कुरुक्षेत्रावरील महासंहारानंतर गांधारीने श्रीकृष्णाला ‘आजपासून छत्तीस वर्षांनी यादव कुळाचा परस्परांशी लढताना पूर्ण विनाश होईल,’ असा शाप दिला. पुढे ही छत्तीस वर्षे श्रीकृष्ण द्वारकेतच होता. त्या काळामध्ये सुरक्षित - ऐषआरामी व निष्क्रिय जीवन यामुळे कुमारवयीन लहानांपासून थोरांपर्यंत सर्व यादवगण मृगया, नृत्य-गायन यात मश्गुल असत; जोडीला अनिर्बंध मद्यपान होतेच! श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलरामही याला अपवाद नव्हता; साहजिकपणे इतरेजन याचा अनायासे लाभ उठवत. यात श्रीकृष्णपुत्र सांब याने महर्षी कश्यपांबरोबर केलेल्या अनुचित आचरणाची भर पडली आणि त्यांनीही यादवकुळाचा नाश होईल, असा शाप दिला. परिणामी, प्रभास क्षेत्री यादवांच्या परस्परांत झालेल्या लढाईने यदुवंशाची अखेर झाली आणि त्यानंतर श्रीकृष्णाचा, पारध्याचा बाण लागून मृत्यू झाला. एका दुर्दैवी कालखंडाची मनाला चुटपुट लावणारी कहाणी!
There are no comments on this title.