Chakra Te Charakha
Summary: भ. श्रीकृष्ण व म.गांधी या दोन्ही युगपुरुषांचे जीवन म्हणजे समाजमनाचा निर्लेप आरसाच. न्याय-नीतिला स्वीकारून या दोघांनीही अन्यायाला आपापल्या पद्धतीने विरोध दर्शवला. गांधींनी उपोषण, स्वपीडनाचा मार्ग स्वीकारून हृदयपरिवर्तन घडवून आणले व ब्रिटिशांना पळवून लावले. तर श्रीकृष्णाने कंस, शिशुपाल, पूतना, नरकासुर इ. अन्याय करण्याऱ्या राक्षसांना मारले व कौरवांशी युद्ध स्वीकारून पांडवांना न्याय दिला. या असामान्य व्यक्तींच्या जीवित ध्येयाचा परीस भारताला गवसला; पण तो न ओळखताच फेकला गेला, ही वस्तुस्थिती. या दोन्ही युगपुरुषांना आयुष्याच्या अखेरी एकाकी-उपेक्षित जीवन वाट्यास आले. कृष्णाचे स्वजन त्याची नजर चुकवून बेभान झाले. मद्यपान, द्यूत, कलह, मारामाऱ्यांनी त्यांनी एकमेकांचा सर्वनाश करवून घेतला. गांधींच्या तत्त्वांना, आदर्शांना जणू चूड लावली गेली. तुरुंगातून सुटल्यावर गांधी शक्तिहीन होऊन पाहात राहिले. कस्तुरबांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांचे ’सत्य’ विद्रूप झाले व ’अहिंसा’ मृत्युपंथाला गेली. ’चक्र ते चरखा’ या पुस्तकातील कृष्ण-गांधींचे विचार आजही उचित ठरतात.
Item type | Current library | Home library | Status | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Checked out | 30/12/2023 | 001322 |
भ. श्रीकृष्ण व म.गांधी या दोन्ही युगपुरुषांचे जीवन म्हणजे समाजमनाचा निर्लेप आरसाच. न्याय-नीतिला स्वीकारून या दोघांनीही अन्यायाला आपापल्या पद्धतीने विरोध दर्शवला. गांधींनी उपोषण, स्वपीडनाचा मार्ग स्वीकारून हृदयपरिवर्तन घडवून आणले व ब्रिटिशांना पळवून लावले. तर श्रीकृष्णाने कंस, शिशुपाल, पूतना, नरकासुर इ. अन्याय करण्याऱ्या राक्षसांना मारले व कौरवांशी युद्ध स्वीकारून पांडवांना न्याय दिला. या असामान्य व्यक्तींच्या जीवित ध्येयाचा परीस भारताला गवसला; पण तो न ओळखताच फेकला गेला, ही वस्तुस्थिती. या दोन्ही युगपुरुषांना आयुष्याच्या अखेरी एकाकी-उपेक्षित जीवन वाट्यास आले. कृष्णाचे स्वजन त्याची नजर चुकवून बेभान झाले. मद्यपान, द्यूत, कलह, मारामाऱ्यांनी त्यांनी एकमेकांचा सर्वनाश करवून घेतला. गांधींच्या तत्त्वांना, आदर्शांना जणू चूड लावली गेली. तुरुंगातून सुटल्यावर गांधी शक्तिहीन होऊन पाहात राहिले. कस्तुरबांचा मृत्यू झाला. त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. त्यांचे ’सत्य’ विद्रूप झाले व ’अहिंसा’ मृत्युपंथाला गेली. ’चक्र ते चरखा’ या पुस्तकातील कृष्ण-गांधींचे विचार आजही उचित ठरतात.
There are no comments on this title.