Travelling To Infinity My Life With Stephen
Publication details: Pune Mehta Publishing HouseDescription: 590Summary: `ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम` या अडीच कोटी प्रतींच्या विक्रीचा विक्रम केलेल्या शास्त्रीय पुस्तकाचे लेखक प्रोफेसर स्टीफन हॉिंकग. त्यांची पहिली पत्नी जेन हिने या पुस्तकात त्यांच्या असाधारण वैवाहिक जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. स्टीफन आपल्या बुद्धिबळावर गगनाला गवसणी घालत असताना ‘मोटर-न्युरॉन’ या मज्जासंस्थांच्या महाभयंकर रोगाचे प्राणघातक हल्ले, मात्र त्याच्या शरीराला जखडून ठेवत होते. आपल्या विकलांग पतीची दिवस-रात्र, अष्टौप्रहर सेवा करणे आणि त्याच वेळी आपल्या वाढत्या कुटुंबाची काळजी वाहणे या दोन्ही कर्तव्यांचा समतोल राखण्यासाठी जेनने केलेले अथक परिश्रम, सोसलेले आघात यांचे तिने अतिशय प्रामाणिकपणे केलेले वर्णन; जे कुटुंब अशा प्रकारच्या रोगाशी सामना करीत असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आणि त्यांचे मनोबल वाढविणारे, त्यांना स्फूर्ती देणारे ठरेल. पतीची असाधारण प्रज्ञा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने पादाक्रांत केलेली यशशिखरे आणि त्यासाठी त्याला जेनने स्वत:च्या आंतरिक शक्तीचा दिलेला बळकट आधार यांची ही कहाणी खरोखरच अविश्वसनीय वाटावी अशीच आहे. त्यातून ती अत्यंत निडर अशा प्रामाणिकपणे सांगितलेली आहे. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वैवाहिक जीवनाची क्लेशकारक अशा घटस्फोटात झालेली परिणती, त्याच्या सेवेतील एका नर्ससाठी स्टीफनने जेनला दिलेली सोडचिठ्ठी आणि जेनने एका जुन्या मित्राशी केलेला विवाह – या सा-याच प्रसंगातून लेखिकेच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय येतो.
Item type | Current library | Home library | Status | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Checked out | 07/12/2025 | 961981 |
`ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम` या अडीच कोटी प्रतींच्या विक्रीचा विक्रम केलेल्या शास्त्रीय पुस्तकाचे लेखक प्रोफेसर स्टीफन हॉिंकग. त्यांची पहिली पत्नी जेन हिने या पुस्तकात त्यांच्या असाधारण वैवाहिक जीवनाचे अंतरंग उलगडून दाखवले आहे. स्टीफन आपल्या बुद्धिबळावर गगनाला गवसणी घालत असताना ‘मोटर-न्युरॉन’ या मज्जासंस्थांच्या महाभयंकर रोगाचे प्राणघातक हल्ले, मात्र त्याच्या शरीराला जखडून ठेवत होते. आपल्या विकलांग पतीची दिवस-रात्र, अष्टौप्रहर सेवा करणे आणि त्याच वेळी आपल्या वाढत्या कुटुंबाची काळजी वाहणे या दोन्ही कर्तव्यांचा समतोल राखण्यासाठी जेनने केलेले अथक परिश्रम, सोसलेले आघात यांचे तिने अतिशय प्रामाणिकपणे केलेले वर्णन; जे कुटुंब अशा प्रकारच्या रोगाशी सामना करीत असेल त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी आणि त्यांचे मनोबल वाढविणारे, त्यांना स्फूर्ती देणारे ठरेल. पतीची असाधारण प्रज्ञा, प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने पादाक्रांत केलेली यशशिखरे आणि त्यासाठी त्याला जेनने स्वत:च्या आंतरिक शक्तीचा दिलेला बळकट आधार यांची ही कहाणी खरोखरच अविश्वसनीय वाटावी अशीच आहे. त्यातून ती अत्यंत निडर अशा प्रामाणिकपणे सांगितलेली आहे. त्यांच्या पंचवीस वर्षांच्या वैवाहिक जीवनाची क्लेशकारक अशा घटस्फोटात झालेली परिणती, त्याच्या सेवेतील एका नर्ससाठी स्टीफनने जेनला दिलेली सोडचिठ्ठी आणि जेनने एका जुन्या मित्राशी केलेला विवाह – या सा-याच प्रसंगातून लेखिकेच्या स्पष्टवक्तेपणाचा प्रत्यय येतो.
There are no comments on this title.