अँबिग्युअस लॉस
Publication details: Pune Mehta Publishing HouseSummary: जीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार असतात. काही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक; तर काही निव्वळ शारीरिक वेदनेच्या रूपात. काही दु:खे तर अशी, की बराच काळ भोगून झाल्यानंतर माणसाला कळतं, की इतकी वर्ष आपण कोणत्या काळ्या छायेत वावरत आहोत ते! तोपर्यंत त्याच्या बNयाच किमती मोजून झालेल्या असतात! अशा या छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणा-या नकळत होणा-या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या अटळ दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षं शोध अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘AMBIGUOUS LOSS’चा शोध. या शोधबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक. ‘LOSS’ म्हणजे काहीतरी गमावणं आणि ‘AMBIGUITY’ म्हणजे अनिश्चितता ही दोन्ही, माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंगे आहेत. ‘AMBIGUOUS LOSS’ मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा ‘AMBIGUOUS LOSS’ अनुभवावा लागतो. त्यावेळेला काहीतरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. तसं नाही झालं, तर हे विचित्र, धूसर, उलगडा न होणारं नुकसान; हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं? असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करून सोडतो. आपल्या परीने शोधतांना, प्रत्येकाची उत्तरे वेगळीच येत असतात; पण ‘AMBIGUOUS LOSS’ पुस्तक वाचल्यानंतर येणारी उत्तरे ही प्रश्नांपेक्षा सोपी असतील एवढं निश्चित!
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Available | 10351 |
जीवन जगत असताना दु:ख आणि हानी कुणाच्या वाट्याला येत नाही? प्रत्येकाला ते भोगावंच लागतं. या हानीचे आणि दु:खाचेही कितीतरी प्रकार असतात. काही शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रासदायक; तर काही निव्वळ शारीरिक वेदनेच्या रूपात. काही दु:खे तर अशी, की बराच काळ भोगून झाल्यानंतर माणसाला कळतं, की इतकी वर्ष आपण कोणत्या काळ्या छायेत वावरत आहोत ते! तोपर्यंत त्याच्या बNयाच किमती मोजून झालेल्या असतात! अशा या छुपेपणाने माणसाचं मन आणि जीवन ग्रासून टाकणा-या नकळत होणा-या, किती काळ भोगावं लागणार तेही नक्की नसलेल्या अटळ दु:खासंबंधी डॉ. पॉलिन बॉस या अमेरिकन विदुषीने अनेक वर्षं शोध अभ्यास केला. त्याचं फलित म्हणजे तिचा ‘AMBIGUOUS LOSS’चा शोध. या शोधबद्दल जनसामान्यांना सांगण्याच्या जिव्हाळ्यातून साकारलेलं हे सोप्या भाषेतलं पुस्तक. ‘LOSS’ म्हणजे काहीतरी गमावणं आणि ‘AMBIGUITY’ म्हणजे अनिश्चितता ही दोन्ही, माणसाच्या अनुभवाची प्रमुख अंगे आहेत. ‘AMBIGUOUS LOSS’ मध्ये ती सहजपणे एकमेकांत मिसळली जातात. प्रत्येकाला आयुष्यात केव्हा ना केव्हा ‘AMBIGUOUS LOSS’ अनुभवावा लागतो. त्यावेळेला काहीतरी निश्चित, स्पष्टपणे कळायला हवं, असं आपल्याला वाटत असतं. तसं नाही झालं, तर हे विचित्र, धूसर, उलगडा न होणारं नुकसान; हे दु:ख घेऊन जगावं तरी कसं? असा प्रश्न माणसांना अस्वस्थ करून सोडतो. आपल्या परीने शोधतांना, प्रत्येकाची उत्तरे वेगळीच येत असतात; पण ‘AMBIGUOUS LOSS’ पुस्तक वाचल्यानंतर येणारी उत्तरे ही प्रश्नांपेक्षा सोपी असतील एवढं निश्चित!
There are no comments on this title.