Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Image from OpenLibrary

अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम

By: Publication details: Pune Mehta Publishing HouseSummary: रामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशांत आणि वेगवेगळ्या धर्मांत मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत, असा अंदाज आहे. सोळाव्या वर्षी रामाला वैराग्य येते, राम गृहत्याग करतो, वनवासी होतो आणि नंतर कुलगुरू वसिष्ठ त्याची समजून घालून, त्याला उपदेश करून जीवनाचा अर्थ समजावून देतात अशी कथा आपल्याकडे प्रसिद्ध म्हणता येईल अशा योगवसिष्ठ रामायणात आहे. कृष्णाच्या रासलीलेने अत्यंत भारावून गेलेल्या लेखणीबहाद्दरांनी रासलीला करणारा रामही रंगवायला कमी केलेले नाही. रामायणाच्या नावाखाली हे सगळे चालत आले आहे. पुढे जाता, ललित साहित्य म्हटले जातील असे अनेक असामान्य काव्यात्म ग्रंथही लिहिले गेले आहेत. भवभूती आणि कालिदासही त्यातच आले. ‘समग्र रामकथा हीच मुळात निव्वळ पुराणकथा आहे, यात सत्याचा लवलेश नाही, असा कोणी राम कधी झालाच नव्हता आणि अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेशातील गाव नाहीच, जावा बेटावरचे जोग्या नावाचे ते एक नगर आहे, थायलंडमधील अयुथ्या (अयोध्या) नावाचे गाव हीच रामजन्मभूमी आहे...’ असली विधाने ‘पुराव्यांनिशी’ करणारेही कमी नाहीत. रामकथा तपासून, पडताळून पाहणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश नाहीच. वाल्मीकीची मूळ रामकथा हा माझ्यापुढचा आदर्श आहे. मूळ रामकथेच्या पात्रांची, तिच्या कथानकाची ह्यात भले पुष्टी झाली नसेल, निष्ठापूर्वक समर्थनही नसेल, क्वचित कुठे तिच्यावर नगण्य जुलूम झाला असेल, पण तरीसुद्धा कुठेही कृत्रिम विरोधाभास वाटू नये अशा अकृत्रिम सहजतेने ह्या कथेचे विणकाम करण्याचा हा निष्ठापूर्वक केलेला प्रयास आहे.
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Status Barcode
Books Head Office Head Office Available 002685
Books Head Office Head Office Lost 10009

रामकथेच्या नावाने आजमितीला वेगवेगळ्या भाषांत, वेगवेगळ्या प्रदेशांत आणि वेगवेगळ्या धर्मांत मिळून सुमारे तीनेकशे रामायणे उपलब्ध आहेत, असा अंदाज आहे. सोळाव्या वर्षी रामाला वैराग्य येते, राम गृहत्याग करतो, वनवासी होतो आणि नंतर कुलगुरू वसिष्ठ त्याची समजून घालून, त्याला उपदेश करून जीवनाचा अर्थ समजावून देतात अशी कथा आपल्याकडे प्रसिद्ध म्हणता येईल अशा योगवसिष्ठ रामायणात आहे. कृष्णाच्या रासलीलेने अत्यंत भारावून गेलेल्या लेखणीबहाद्दरांनी रासलीला करणारा रामही रंगवायला कमी केलेले नाही. रामायणाच्या नावाखाली हे सगळे चालत आले आहे. पुढे जाता, ललित साहित्य म्हटले जातील असे अनेक असामान्य काव्यात्म ग्रंथही लिहिले गेले आहेत. भवभूती आणि कालिदासही त्यातच आले. ‘समग्र रामकथा हीच मुळात निव्वळ पुराणकथा आहे, यात सत्याचा लवलेश नाही, असा कोणी राम कधी झालाच नव्हता आणि अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेशातील गाव नाहीच, जावा बेटावरचे जोग्या नावाचे ते एक नगर आहे, थायलंडमधील अयुथ्या (अयोध्या) नावाचे गाव हीच रामजन्मभूमी आहे...’ असली विधाने ‘पुराव्यांनिशी’ करणारेही कमी नाहीत. रामकथा तपासून, पडताळून पाहणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश नाहीच. वाल्मीकीची मूळ रामकथा हा माझ्यापुढचा आदर्श आहे. मूळ रामकथेच्या पात्रांची, तिच्या कथानकाची ह्यात भले पुष्टी झाली नसेल, निष्ठापूर्वक समर्थनही नसेल, क्वचित कुठे तिच्यावर नगण्य जुलूम झाला असेल, पण तरीसुद्धा कुठेही कृत्रिम विरोधाभास वाटू नये अशा अकृत्रिम सहजतेने ह्या कथेचे विणकाम करण्याचा हा निष्ठापूर्वक केलेला प्रयास आहे.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image Local cover image
Share