Mahabhartatil Matruvandana

Dinkar Joshi

Mahabhartatil Matruvandana

महाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच ‘महाभारताच्या नायकपदी कोण’ हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही; असे जरी म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विशिष्ट दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत हे नक्की. महाभारतातील ह्या स्त्रियांकडे पाहून आपण मोहित होतो एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते अरे! महाभारताच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल, तर दुसया तिसया कुणाला नाही ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच ते स्थान दिले पाहिजे!