अ‍ॅना आणि सयामचा राजा

Margaret Landon Manik Phatak

अ‍ॅना आणि सयामचा राजा - Pune Mehta Publishing House - 344

अ‍ॅना ही पाश्चात्त्य संस्कृतीत वाढलेली, मानवतावादी मूल्ये जपणारी स्त्री; सयामसारख्या (आताचा थायलंड) बुरसटलेल्या, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा असलेल्या, रूढी-प्रथांना महत्त्व देणा-या गुलामांच्या देशात इंग्रजी शिकवायला जाते. सयाममध्ये अ‍ॅनाला जुळवून घेणे फार जड जाते, पण तरी व्यक्तिगत आयुष्यातली सुखदु:खे भोगत, ती तिच्या इतरांचे कष्ट दूर करण्याच्या मनोवृत्तीला, ऊर्मीला थांबवू शकत नाही. तिचे उदार अंत:करण आणि अन्यायाविरुद्ध उभे ठाकण्याची वृत्ती यांमुळे सयामचा राजा आणि राजपुत्र प्रभावित होतातच; पण तिच्या पश्चात सयामी जनताही तिची ऋणाईत राहते. तिच्या शिकवणुकीच्या प्रभावामुळेच राजपुत्र सयाममधील अयोग्य चालीरीतींना कायमची तिलांजली देतो आणि सयामला नवी दिशा दाखवतो. जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वीच्या कालखंडातली ही हकिकत म्हटली तर अद्भुत; म्हटली तर वास्तववादी अंधारात चाचपडणा-या एका समाजाची; मानवतेसाठी संघर्ष करणा-या एका स्त्रीची.