The ghost in love

Jonathan Carrol Uday Kulkarni

The ghost in love - Pune Mehta Publishing House - 282

एक माणूस मरण पावतो आणि विचित्र काहीतरी घडतं. तो माणूस ‘मरत’ नाही. त्यामुळे मृत्यूनंतरच्या प्रवासाकरिता त्याच्या आत्म्याला न्यायला आलेलं भूत आश्चर्यचकित होतं. ते भूत त्याच्या वरिष्ठाकडे जातं आणि आता काय करायचं, असा प्रश्न विचारतं. वरिष्ठदेखील बुचकळ्यात पडतो. त्यालाही हे कसं काय झालं, याचा उलगडा होत नाही. तो त्या भुताला माणसासोबतच राहण्याचा सल्ला देतो. बिचारं भूत सल्ला मान्य करतं. आणि मग गमतीशीर गोष्टी घडायला लागतात. ते भूत त्या माणसाच्या मैत्रिणीच्या प्रेमातच पडतं आणि गुंतागुंत वाढतच जाते! लवकरच त्या माणसाला कळतं की, तो मेला नाही. कारण इतिहासात प्रथमच माणसांनी आपलं नशीब देवावरती सोपवणं बंद केलेलं असतं. हा बदल चांगला असला, तरी त्याची किंमत मात्र मोजावी लागणार असते.... नशीब, श्रद्धा, प्रेम अशा विषयांवर खुमासदार व खुसखुशीत शैलीत भाष्य करणारी फॅटसी