Swapnanche Indradhanu

Rashmi Bansal Suniti Kane

Swapnanche Indradhanu - Pune Mehta Publishing House - 384

दीपा सोमण यांनी ते करून दाखवलं! निर्मला कांदळगावकर यांनाही ते जमलं! नीना लेखीनंसुद्धा ते केलं! मग ते तुम्हालाही का नाही जमणार? आव्हान स्वीकारण्याचं धाडस करणा-या २५ असाधारण स्त्रियांच्या कर्र्तृत्वाचा आलेख म्हणजे हे पुस्तक. या स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांनी स्थापन केलेल्या उद्योगाचं प्रेमानं लालनपालन केलं. हे काम त्यांनी मोठ्या प्रेमानं, हसत-खेळत आणि सहनशीलतेनं केलं. त्यांनी अनेक आघाड्या सांभाळताना, ना कधी तडजोड केली; ना कधी हार मानली! या कहाण्या एकच सत्य सांगताहेत : स्त्रिया वेगळ्या प्रकारे विचार करतात; आणि वेगळ्या प्रकारे वागतात, परंतु त्या तेवढ्याच यशस्वी होऊ शकतात. या यशस्वी उद्योजिकांच्या कहाण्या प्रेरक तर आहेतच, पण त्या तुमच्यात दडलेल्या उद्योजिकेलाही साद घालतात. इतकंच नव्हे, पुरुषांनाही काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी देतात!