हेरगिरीचा पोरखेळ

georgina harding

हेरगिरीचा पोरखेळ - Pune Mehta Publishing House

एका गारठलेल्या सकाळी आठ वर्षांच्या अ‍ॅनाची आई घराबाहेर पडते आणि गर्द धुक्यात हरवून जाते.... या घटनेकडे फिरून पाहताना अ‍ॅनाला वाटते की, आपण त्या दिवशी घडलेल्या सगळ्या गोष्टी नीट तपशीलवार लक्षात ठेवायला हव्या होत्या. अ‍ॅनाच्या मनात तिच्या आठवणी रेंगाळू लागतात.... अ‍ॅनाचा मोठा भाऊ पीटर हेरगिरी, शीतयुद्ध काळातल्या घटना, त्यामुळे उडणारा अफवांचा धुरळा व रहस्यमयता यांकडे आकर्षित होतो. तो अ‍ॅनाला म्हणतो की, त्यांना आईचा मृत्यू झालाय असं सांगितलं गेलंय. पण ते खरं असेल कशावरून? ते तर अंत्ययात्रेलाही गेलेले नाहीत. आणि मग तो आईबद्दल एक गोष्ट रचू लागतो – पूर्व जर्मनीतली निर्वासित असलेली त्यांची आई मरण पावली नसून कदाचित ती रहस्यमयरीत्या हेरगिरी करत असावी.... अ‍ॅना तिच्या कल्पनेमध्ये आईच्या आठवणींचे तुकडे जोडत तिची प्रतिमा तयार करू लागते.... तिच्या आईचं आयुष्य गूढ आणि रहस्यांनी भरलेलं होतं का? तिची आई कोण होती? भूतकाळ, आठवणी, कल्पना आणि वास्तव यांचा कौशल्याने विणलेला रहस्यमय गोफ!