क्रायसिस

Robin Cook

क्रायसिस - Pune Mehta Publishing House

क्रेग बोमन या निष्णात हृदयरोगतज्ज्ञावर, हलगर्जीपणा केल्यानं, रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल खटला सुरू होतो. स्वत:चं लग्न अवघ्या दोन दिवसांवर आलं असताना, केवळ बहिणीचा संसार वाचावा म्हणून,वैद्यकीय तपासनीस असणारा जॅक स्टेपलटन क्रेगच्या मदतीस सरसावतो. सत्य उघडकीस आणण्यासाठी तो अनेक महिन्यांपूर्वी दफन केलेल्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा धाडसी निर्णय घेतो. धमक्यांचा सामना करत, जिवावर उदार होऊन जॅक हे काम पार पाडतो. पण त्यामधून बाहेर आलेलं सत्य फारच भयंकर निघतं...