आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद
Michael Hastings
आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद - Pune Mehta Publishing House
लहानपणापासून लष्कर, शस्त्रास्त्रं, युद्ध याबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण असलेला मायकेल होस्टिंग्ज मोठा झाल्यावर ‘न्यूजवीक’चा वार्ताहर होतो आणि इस्राइल, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी अनुभव घेतल्यावर त्याची नेमणूक इराकमधील वार्ताहर म्हणून होते. ते काम त्याला आवडतं; परंतु त्याच सुमारास अॅन्डी या अतिशय हुशार, सुरेख आणि आदर्शवादी तरुणीच्या तो प्रेमात पडतो आणि एकमेकांपासून दूर राहणं दोघांना खूप जड जातं. आदर्शवादी अॅन्डी सद्दामच्या पाडावानंतर इराकमधील राजकीय पक्षांना लोकशाही मूल्यं प्रस्थापित करण्यास मदत करण्याच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि मायकेल आहे त्या देशात राहायला मिळेल म्हणून इराकमध्ये नॅशनल डेमोक्रटिक इन्स्टिट्यूटमध्ये नोकरी मिळवून बगदादला येते, उत्साहानं कामाला लागते. परंतु इराकमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट असते. जी हिंसा चालू असते, ती विश्वास बसणार नाही, कल्पना करता येणार नाही, समजणार नाही अशी असते. अमेरिकन सैनिकांच्या मनातही कडवटपणा असतो, कठोर उपहास असतो. किती अमेरिकन कुटुंबांचा सत्यानाश करीत असतं हे युद्ध हे त्यांच्या सरकारला समजत नसतं? २००६ साल संपतं तेव्हा छत्तीस हजार इराकी मेलेले असतात, आठशेहून जास्त अमेरिकन्स मेलेले असतात, पन्नास कोटी डॉलर्स खर्च झालेले असतात. शिया आणि सुन्नी एकमेकांना तर मारत असतातच; परंतु अमेरिकन लष्कर आणि अमेरिकन माणसं तर तेथे कोणालाच नको असतात म्हणून तेही मारले जात असतात. अशा भयानक वातावरणात उत्साह आणि चिकाटी टिकवून धरून काम करू पाहणा-या मायकेल आणि अॅन्डीच्या प्रेमकथेचा जो अत्यंत दुर्दैवी आणि भयानक अंत होतो, त्याबद्दल प्रत्यक्षच वाचा–
9788184981902