ए थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स

KHALED HOSSEINI

ए थाऊजंड स्प्लेन्डीड सन्स - Pune Mehta Publishing House

अफगाणिस्तानातील ३० वर्षांच्या काळातल्या अस्थिर प्रसंगांची श्वास रोखून धरायला लावणारी मारियम आणि लैला यांची ही कथा. ही कथा वाचताना तालिबानच्या प्रदेशावरील सोव्हिएत आक्रमणापासून ते तालिबानच्या पुनस्र्थापनेपर्यंतच्या सत्तापालटाच्या कालखंडातील संघर्षमय प्रवास तुम्ही अनुभवाल. हिंसाचार, भय, आशा, श्रद्धा, यांवर जबरदस्त विश्वास असलेल्या देशातील मनोव्यापारांचा हा आलेख आहे. व्यक्तिगत आयुष्यातील धडपडीत झगडून टिकून राहण्यासाठी करायला लागणा-या संघर्षाची दोन पिढ्यातील ही शोकांतिका आहे आणि तरीही भोवताली फिरणा-या गुंतागुंतीच्या प्रसंगातूनही आनंद शोधताना कथेमध्ये वाचकाला पूर्ण गुंतवून ठेवते.