ब्लडमनी

chris collett

ब्लडमनी - Pune Mehta Publishing House

गुप्तहेर खात्यातील उपायुक्त मरिनर सुट्टी घेणार, इतक्यात डे नर्सरीच्या पाळणाघरातून सहा आठवड्यांच्या जेसिका क्लिनमानचे अपहरण होते. त्याची रजा रद्द होते. या पब्लिक केसमध्ये मरिनर पुढाकार घेतो. सुरुवातीला केवळ एक अपहरण वाटणारी ती घटना नंतर नियोजनबद्ध योजना वाटू लागली. हेतू स्पष्ट होईपर्यंतच मरिनरला शोध लागतो की, अपहरण झालेल्या मुलीचे वडील शास्त्रीय संशोधन कंपनीत काम करत आहेत आणि प्राणी हक्कांसाठी लढणान्याचे ते लक्ष्य आहेत. दोन दिवसांनी ही घटना जेव्हा आश्चर्यजनकपणे समोर येते, तेव्हा एका तुटक मजकूराच्या चिठ्ठीमुळे निश्चित होते की, प्राणी हक्क संरक्षण करणारेच लोक या भीती घालण्यामागे आहेत. पण पाळणाघरातील एक कर्मचारी जेव्हा एका गाडीखाली मारलीR जाते, तेव्हा ही केस खऱ्या अर्थाने खुलते.... वातावरण आणि व्यक्तिरेखेचे मार्मिक आणि चटपटीत वर्णन करणारी, कोलेट एक उत्तम लेखिका आहे... तिचे अधिक लेखन स्वागतार्ह....!