Swargachya Vatevar Kahitari Ghadala
Summary: आपल्यापैकी प्रत्येकाकडेच एक कहाणी असते, जिच्यामुळे आपला जगण्यावरचा विश्वास दृढ होतो... सुधा मूर्तींच्या पुस्तकाच्या पानोपानी भेटणारी माणसं आणि त्यांच्या रोमहर्षक कहाण्या आपल्या मनावर कायमचा ठसा ठेवून जातात. पण या सर्व पुस्तकांमधून आपल्याला जी कुणी माणसं भेटतात, ती सुधा मूर्तींच्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं वेळोवेळी त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेली माणसं असतात. पण तशाच प्रकारच्या कहाण्या इतरांच्याही आयुष्यात घडल्या असतील. प्रत्येकाकडेच सांगण्यासारखं काहीतरी असेल. ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हा अत्यंत संस्मरणीय अशा वीस सत्यकथांचा संग्रह आहे. पेंग्विन प्रकाशनातर्फे जी खुली कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्या स्पर्धेत उतरलेल्या असंख्य कथांचं सुधा मूर्ती यांनी जातीनं परीक्षण करून, त्यातून उत्कृष्ट अशा या वीस कथा निवडल्या. आपण आपल्या खडतर, कष्टप्रद अशा दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना हे जीवन आशा, श्रद्धा, दयाळूपणा आणि आनंद यांनी किती ओतप्रोत भरलेलं असतं, याची प्रचीती या कथा वाचून आपल्याला येते. अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशा कथांचा हा संग्रह, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाला मंत्रमुग्ध करून टाकेल.
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Available | 001230 |
आपल्यापैकी प्रत्येकाकडेच एक कहाणी असते, जिच्यामुळे आपला जगण्यावरचा विश्वास दृढ होतो... सुधा मूर्तींच्या पुस्तकाच्या पानोपानी भेटणारी माणसं आणि त्यांच्या रोमहर्षक कहाण्या आपल्या मनावर कायमचा ठसा ठेवून जातात. पण या सर्व पुस्तकांमधून आपल्याला जी कुणी माणसं भेटतात, ती सुधा मूर्तींच्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं वेळोवेळी त्यांच्या आयुष्यात येऊन गेलेली माणसं असतात. पण तशाच प्रकारच्या कहाण्या इतरांच्याही आयुष्यात घडल्या असतील. प्रत्येकाकडेच सांगण्यासारखं काहीतरी असेल. ‘स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडलं’ हा अत्यंत संस्मरणीय अशा वीस सत्यकथांचा संग्रह आहे. पेंग्विन प्रकाशनातर्फे जी खुली कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली, त्या स्पर्धेत उतरलेल्या असंख्य कथांचं सुधा मूर्ती यांनी जातीनं परीक्षण करून, त्यातून उत्कृष्ट अशा या वीस कथा निवडल्या. आपण आपल्या खडतर, कष्टप्रद अशा दैनंदिन जीवनाची वाटचाल करत असताना हे जीवन आशा, श्रद्धा, दयाळूपणा आणि आनंद यांनी किती ओतप्रोत भरलेलं असतं, याची प्रचीती या कथा वाचून आपल्याला येते. अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी अशा कथांचा हा संग्रह, माणसाच्या चांगुलपणावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक वाचकाला मंत्रमुग्ध करून टाकेल.
There are no comments on this title.