अश्रू आणि हास्य
Publication details: Pune Mehta Publishing HouseSummary: १९२५ साली मी कथालेखनाला प्रारंभ केला.तेव्हापासून पुढे बारातेरा वर्ष,शाळेच्या धबडग्यातून जशी सवड मिळेल,तशी मी गोष्टी लिहित असे....." "अश्रू आणि हास्य " संग्रहातल्या तेरा गोष्टी चाळतांना माझ्या मनात विविध विचारतरंग निर्माण होत आहेत.या बहुतेक गोष्टी मी शिरोड्याला असतांना लिहिल्या असल्यामुळे त्या वाचतांना ;कालोदरात लुप्त झालेले माझे पंधरावीस वर्षांपूर्वीचे जीवनच जणू काही माझ्या डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभे राहत आहे.त्या चिमुकल्या खेडेगावातला सुंदर निसर्ग,माझ्या कथांचे कळत नकळत स्पुर्तिस्थान होणारी तिथली आंबटगोड माणसे,अनेक स्वादिष्ठ व खारटतुरट घटना,इतकेच नव्हे, तर आज ज्याच्याकडे मी तटस्थपणाने,किंबहुना कठोर टीकाकाराच्या दृष्टीने पाहू शकतो,असा त्या वेळचा कथाकार खांडेकर,या सर्वांविषयीच्या आठवणी माझ्या या विचारतरंगाबरोबर अंतर्मनातून वर येत आहेत......." "मी कथा लिहिल्या ,तो काळ मराठी लघुकथेच्या पहिल्या बहराचा होता.तो बहर १९४० च्या आसपास संपला."
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Available | 6994 |
१९२५ साली मी कथालेखनाला प्रारंभ केला.तेव्हापासून पुढे बारातेरा वर्ष,शाळेच्या धबडग्यातून जशी सवड मिळेल,तशी मी गोष्टी लिहित असे....." "अश्रू आणि हास्य " संग्रहातल्या तेरा गोष्टी चाळतांना माझ्या मनात विविध विचारतरंग निर्माण होत आहेत.या बहुतेक गोष्टी मी शिरोड्याला असतांना लिहिल्या असल्यामुळे त्या वाचतांना ;कालोदरात लुप्त झालेले माझे पंधरावीस वर्षांपूर्वीचे जीवनच जणू काही माझ्या डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभे राहत आहे.त्या चिमुकल्या खेडेगावातला सुंदर निसर्ग,माझ्या कथांचे कळत नकळत स्पुर्तिस्थान होणारी तिथली आंबटगोड माणसे,अनेक स्वादिष्ठ व खारटतुरट घटना,इतकेच नव्हे, तर आज ज्याच्याकडे मी तटस्थपणाने,किंबहुना कठोर टीकाकाराच्या दृष्टीने पाहू शकतो,असा त्या वेळचा कथाकार खांडेकर,या सर्वांविषयीच्या आठवणी माझ्या या विचारतरंगाबरोबर अंतर्मनातून वर येत आहेत......." "मी कथा लिहिल्या ,तो काळ मराठी लघुकथेच्या पहिल्या बहराचा होता.तो बहर १९४० च्या आसपास संपला."
There are no comments on this title.