000 04496nam a22001577a 4500
003 inpulm
005 20220626184209.0
008 220626b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _adr. laxminarayan bolli
245 _aकृष्णदेवराय
247 _akrushnadevrai
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aविजयनगर साम्राज्य म्हणजे भारतीय हिंदू संस्कृतीचा,हिंदवी स्वराज्य स्थापनेचा `महोन्नत महामेरू` म्हणून ओळखले जाते. धर्म, संस्कृती, नृत्य, नाट्य, साहित्य, संगीत या संदर्भांत या साम्राज्याचे फार मोठे योगदान आहे. या साम्राज्याच्या इतिहासातील सर्व सम्राटात `कृष्णदेवराय` हा अतुलनीय असा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरची सेना दिग्विजयी गणली गेली. श्री चैतन्य महाप्रभू, वल्लभाचार्य, संत कनकदास, संत पुरंदरदास आदी सत्पुरुषांना त्याने सन्मानित केले. प्रख्यात मध्वाचार्य श्री व्यासतीर्थ हे त्याचे गुरू होते. कृष्णदेवराय हा केवळ लष्करी बाण्याचा सम्राट नव्हता, तो लोकहितदक्ष राजाही होता. त्याने आपल्या प्रजेच्या सुखासाठी, लोकहितासाठी अनेक कामे केली. त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक कार्याविषयी तत्कालीन परकीय पोर्तुगीज प्रवाशांच्या वृत्तांतातून विश्वसनीय माहिती व तपशील उपलब्ध झाले आहेत. या प्रवाशांनी विजयनगरला भेट देऊन तेथे काही दिवस वास्तव्य केले होते. तसेच कृष्णदेवरायाने खोदलेल्या शिलालेखातूनही त्याच्या कार्याची माहिती मिळते. विजयनगरपासून बेळगाव, गोवा, कटक ते श्रीलंकेपर्यंत त्याने राज्य केले. कन्नड, तेलुगु, तमिळ, संस्कृत या विविध भाषांतून त्याचे मनोज्ञ असे ग्रंथलेखन केले. आंध्रचा `भोजराजा` म्हणून त्याची ख्याती सर्वदूर दरवळली होती. त्याच्या दरबारात महान असे अष्टदिग्गज कवी होते. `तेलुगु कालिदास` म्हणून सर्वश्रुत असलेल्या `श्रीनाथ` कवीची त्याने सुवर्णतुला केली. अवघ्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने तिसाहून अधिक लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या. त्याने लिहिलेल्या `अमुक्तमाल्यदा` या काव्यग्रंथाची गणना तेलुगूतल्या सर्वश्रेष्ठ अशा पंचकाव्यात होते. शस्त्र आणि शास्त्र यांच्यावर अभूतपूर्व हुकमत गाजवणारा असा दुसरा सम्राट झाला नाही.
942 _cBK
_03
_2ddc
_n0
999 _c4453
_d4453