000 03629nam a22001577a 4500
003 inpulm
005 20241115213811.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _bmar
_cinpulm
100 _aTaslima Nasreen
245 _aलज्जा
247 _aLajja
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aतसलिमा नासरिन या बांग्लादेशी लेखिकेची ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते. दत्त कुटुंबीय– सुधामयबाबू, किरणमयी आणि त्यांची दोन मुलं, सुरंजन आणि माया– हे बांग्लादेशचे रहिवासी आहेत. बांग्लादेशात हिंदू ह्या अल्पसंख्याक जमातीचा समाजातील बहुसंख्याकांकडून अनन्वित छळ केला जात असतो, पण हे हिंदू कुटुंब मात्र या छळाला तोंड देत आपल्या मातृभूमीवरच राहणं पसंत करतं. आपल्या इतर आप्तस्वकीयांप्रमाणे ते आपला देश सोडून जायला तयार नसतात. सुधामयबाबू हे एक नास्तिक.. देशप्रेमानं, आशावादानं, आदर्शवादानं भरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. आपली मातृभूमी आपल्याकडे पाठ फिरवणार नाही, आपल्याशी प्रतारणा करणार नाही, या भोळ्याभाबड्या आशेवर ते विसंबून राहिले आहेत. आणि मग... ६ डिसेंबर, १९९२ रोजी भारतात काही धार्मिक मूलतत्त्ववाद्यांनी बाबरी मशिदीचा विनाश केला. साNया जगानं या घटनेचा निषेध केला. पण या कृत्याचे पडसाद शेजारी राष्ट्र असलेल्या बांग्लादेशात मात्र फार तीव्रतेनं उमटले. हिंदूंच्या छळासाठी आणखी एक निमित्त मिळालं... दत्त कुटुंबीयांवरही संकटाची कुहाड कोसळते. ते भरडले जाऊ लागतात. त्यांचं जीवन, त्यांचं छोटंसं विश्व उद्ध्वस्त होतं. अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी मूलतत्त्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते आणि वाचकाला अंतर्मुख करते.
942 _cBK
_011
_2ddc
_n0
999 _c3669
_d3669