000 03431nam a22001217a 4500
005 20250727001905.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _cinpulm
100 _aRajan Gavas
245 _aAapan Mansat Jama Nahi
520 _aराजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तहेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत वेंÂद्रवर्ती राहिलेला आहे. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.
942 _cBK
_025
_2ddc
999 _c3062
_d3062